आता गाडीवर लागलेल्या ‘FASTag’ व्दारे खरेदी करू शकता ‘पेट्रोल-डिझेल’, ‘पार्किंग’ चार्जेस देखील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने वाहन चालकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता पार्किंगसाठी, पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला कॅश, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागणार नाही. तर तुमच्या गाडीवर लावण्यात आलेल्या Fastag चा वापर करता येईल. सरकारचा प्रयत्न आहे की ‘वन नेशल वन फास्टॅग’ योजनेंतर्गत फास्टॅगचा वापर देशातील सर्व हायवे आणि एक्सप्रेस वे वर करण्यात येईल.

आरबीआयने केले नोटिफिकेशन जारी
आरबीआयने फास्टॅगच्या माध्यमातून पार्किंग आणि पेट्रोल – डिझेल खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच आरबीआयने यासंबंधित नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार सर्व कार्ड, यूपीआय, नॉन बँकिंग प्रीपेड पेमेंट इंस्ट्रुमेंटला नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनला जोडण्यात येईल. IDFC ही देशातील पहिली बँक आहे ज्या बँकेला आरबीआयकडून पेट्रोल पंपवर फास्टॅगच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेल भरण्यास मंजुरी दिली आहे.

1 डिसेंबरनंतर अनिवार्य
फास्टॅगचे संचलन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून करण्यात येते. फास्टॅग रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिशेकन टॅग आहे, जो गाडीच्या काचेवर लागवण्यात येतो. सरकारने सर्व गाड्यावर फास्टॅग अनिवार्य केले आहे. जसे की तुमची गाडी टोल नाक्याच्या जवळ जाते तसे टोल नाक्यावरील सेंसर तुमच्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावलेल्या फास्टॅगच्या संपर्कात येतो आणि तुमच्या खात्यातून शुल्क कापले जातात. तुम्ही न थांबता प्लाजावर कर भरु शकतात.

तुमच्या गाडीवर लावलेला हा टॅग, तुमचे प्रीपेड खाते अ‍ॅक्टिव होऊन आपले काम सुरु करेल. याशिवाय तुमच्या फास्टॅग खात्यातील पैसे संपल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा रिचार्ज करावे लागेल.

पाच वर्षांची वैधता
तुमची कार टोल नाक्यावर गेल्यावर फास्टॅगमधून आपोआप शुल्क आकारण्यात येईल. त्याचा तुमच्या मोबाइलवर एक मेसेज देखील येईल, ज्यातून तुम्हाला कळेल की तुमच्या फास्टॅग खात्यातून किती शुल्क आकरण्यात आले आहे. या फास्टॅगची वैधता फक्त 5 वर्षांची आहे. यानंतर तुम्हाला नवीन फास्टॅग खरेदी करुन गाडीवर लावाला लागेल. दिल्लीत हा प्रयोग राबला गेला आहे, तेथे सर्व व्यवसायिक वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य आहे.

राष्ट्रीय महामार्गावर एकूण 527 टोल नाके
देशात सध्याच्या स्थितीला राष्ट्रीय महामार्गावर एकूण 527 टोल नाके आहेत. ज्यात 380 टोल नाक्यावर लेन फास्टॅग लेस आहेत. इलेक्ट्रिनिक टोल कलेक्शन सिस्टिम किंवा फास्टॅग योजना भारतात सर्वात आधी 2014 मध्ये सुरु झाली. ज्यानंतर संपूर्ण देशात टोल नाक्यावर हे लागू करण्यात आले. फास्टॅगमुळे टोल नाक्यावर लोकांचा जास्त वेळ वाळ्या जात नाही.

फास्टॅगचे फायदे
1) वेळेची, इंधनाची बचत होते. पारदर्शी व्यवस्था. टोल नाक्यावर कमी गर्दी होते. तसेच कोणत्या वाहनात कोण आहे हे लक्षात येईल.

2) गृह मंत्रालयाला गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणं शक्य होईल. फास्टॅग नेटवर्क जीएसटीला जोडले आहे. आधार सारखे काम करेल कारण त्याला तुमच्या वाहनाची माहिती जोडलेली असते.

3) सर्व लाइन फास्टॅगवाल्या होतील. फक्त एकाच लाइनमध्ये रोख स्विकारली जाईल. ई वे बिल प्रणालीमुळे महसूल अधिकाऱ्यांनी आवक जावकाची महिती मिळेल. यावर फास्टॅगचा देखील फायदा तुम्ही मिळवू शकतात.

कुठून खरेदी करावा लागेल फास्टॅग
1) सध्या 22 बँकांकडे फास्टॅग इशू करण्याची सुविधा आहे, ज्यात आयसीआयसीआय, एसबीआय आणि पेटीएम बँक सहभागी आहे.

2) देशात 450 टोल नाक्यावर फास्टॅग सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

3) ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवरुन देखील फास्टॅग खरेदी करु शकतात.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like