बावधनमध्ये अपघात, एकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

वेगातील वाहनाची धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-बेंगलोर महामार्गावर बावधन येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास झाला.

[amazon_link asins=’B077PWB22Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’439b9f46-8412-11e8-8ba8-19b5d750bb97′]

मारुती सटवा फाटक (३५, रा. बावधन) याचा मृत्यू झाला आहे. तर अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वसंत सटवा फाटक यांनी फिर्याद दिली आहे. मारुती हे रस्ता ओलांडत असताना वाहनाची धडक बसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.