अवनीच्या बछड्याला जेरबंद करण्यात यश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – नरभक्षक अवनी वाघिणीचे दोन बछडे आहेत. ज्यांचा अनेक दिवसांपासून शोध घेण्याचे काम सुरु आहे.  C1 आणि C2 अशी या दोन बछड्यांची नावे आहेत. याच दोन बछड्यांपैकी मादी बछड्याला पकडण्यात आता यश आलं आहे. सदर बछड्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.

समोर आलेल्या माहीतीनुसार, अवनी वाघिणीच्या जेरबंद केलेल्या मादी बछड्याला आज नागपूर गोरेवाडा याठिकाणी पाठवण्यात आलं असून त्या बछड्याला पेंच व्याघ्रप्रकल्पात पाठवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु असे असले तरी या वृत्ताला अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकलेला नाही. असे दिसत आहे.

एका बछड्याला जेरबंद करण्यात यश आलं असलं तरी मात्र दुसऱ्या बछड्याला जेरबंद करण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरुच असल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर या माेहिमेसाठी मध्य प्रदेशातून  4 हत्तींनाही पाचारण करण्यात आलं आहे अशी माहिती समजत आहे.

काही दिवसांपूर्वीच अवनी उर्फ T1 या वाघिणीला ठार करण्यात आलं. अवनीला ठार केल्यानंतर दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाची अंजी परिसरात मोहीम सुरू झाली. 19 तारखेला सकाळी ही मोहीम सुरू करण्यात आली. मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्तींसह दोन पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथक दोन्ही बछड्यांचा जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अंजी परिसरातील संपूर्ण 80 एकर परिसर तार कुंपण सह कापडी कुंपणही करण्यात आले आहे. इतकेच नाही तर अंजी परिसरातील जंगलात वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांव्यतिकिक्त कोणालाही जाण्यास बंदी करण्यात आली आहे. त्याचसोबत या भागात जाण्यासाठीच्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असल्याचं समजत आहे.