पिस्तूल बाळगणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट एक ने केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी असताना देखील बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट-१ ने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जीवंत काडतूस जप्त केले आहे.

अनिल अरुण कांबळे (वय २१, रा. गणपती मंदीराजवळ, वाघोली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
[amazon_link asins=’B00WJI8L1G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88f9f750-843b-11e8-aff4-91ab687157a1′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुन्हे शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्यासह या शाखेचे अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीच्या तसेच घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस नाईक सचिन जाधव यांना एक व्यक्ती कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा शस्त्र बाळगून साऊथ मेन रोड, कोरगाव पार्क येथे उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट १ च्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल तसेच १ जिवंत काडतूस असा एकूण ५० हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन भोसले-पाटील, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, इम्रान शेख, इरफान मोमीन, पोलीस हवालदार रिजवान जिनेडी, गजानन सोनुने, श्रीकांत वाघवले, तुषार मालवदकर, राजु पवार, सुधाकर माने, प्रकाश लोखंडे, मेहबुब मोकाशी, अशोक माने, पोलीस नाईक तुषार खडके, सुभाष पिंगळे, प्रशांत गायकवाड यांनी केली.