मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे/वाकड : पोलीसनामा ऑनलाइन – दारुपिण्यासाठी आणि मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून 90 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टी येथे करण्यात आली. रवि उर्फ राजेश बंडू थोरात असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी करणारा म्हातोबानगर येथील त्यांच्या घराजवळ थांबला असून तो चोरलेल्या दुचाकींची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस हवालदार नारायण जाधव यांना मिळाली. पोलिसांनी रवि थोरात रहात असलेल्या घराजवळ सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्याने वाकड, हिंजवडी आणि आकुर्डी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच वडगाव मावळ पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी रवी थोरात हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी वाकड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी वसुदेव मुंढे, अदिनाथ मिसाळ, नारायण जाधव, धर्मराज आवटे, संजय गवारे, लक्ष्मण आढारी, गोविंद चव्हाण, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, तुषार काळे, धनाजी शिंदे, आजीनाथ ओंबासे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर