विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ऑटो रिक्षाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ८.३० वा. सुमारास उंड्री-पिसोळी पुणे येथे घडली.

ज्योतीदत्‍त रामराव तीबोले (वय ४३, राहणार- सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे. मुळगाव – रामनगर, उस्मानाबाद) असे मृत दुचाकी स्वराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात ऑटो रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Undri
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीदत्‍त हा शुक्रवारी त्याच्या दुचाकीवरून उंड्री पिसोळी रस्त्यावरून जात असताना आंबेकर हॉटेल समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ऑटो रिक्षाने ज्योतीदत्‍त याच्या दुचाकीला जोरात धडक दिली यामध्‍ये ज्योतीदत्‍त याचा जागीच मृत्यू झाला. कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहोचून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती देत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

ऑटो रिक्षा MH.12.CH.1633 चा चालक मोहन पंढरीनाथ कड (वय ३५, राहणार. रिलायन्स टॉवर शेजारी उंड्री, पुणे) हा मृत्यूस कारणीभूत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार डोईफोडे करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like