बीडमध्ये पैशांचा महापूर ! एकाला रेडहॅन्ड पकडलं, जयदत्त क्षीरसागरांकडून वाटप होत असल्याचा एसकेंचा आरोप (व्हिडिओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक पक्ष प्रचारसाठी आपला कस लावताना दिसतोय. आज सायंकाळी 6 नंतर सर्व पक्षांचा प्रचार बंद होणार आहे. असे असतानाच बीडमध्ये एकाला पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. बीड शहरातील खंडेश्वरी मंदिराजवळ पैसे वाटताना बीड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना समोर आलीय.

स्कूटीच्या डिक्कीत असलेली लाखो रुपयांची रक्कम आणि पैसे वाटलेल्या लोकांची यादी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलीय. सदर व्यक्ती कोणत्या पक्षाशी संबंधित आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांना याबाबत विचारणा केली असता यावर काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिलाय.

या प्रकारानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी मात्र याबाबत कारवाई करण्याची मागणी केलीय. इतकेच नाही तर संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आरोप करत हे पैसे त्यांचे असल्याचं म्हटलंय. दरम्यान पैसे वाटणारा आणि पैसे घेणारा अशा दोन्हींवर कारवाई करण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी केलीय.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

Loading...
You might also like