मुंबईमध्ये घराचा भाग कोसळून एकाचा मृत्यू तर चौघे जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमधील चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीमध्ये घराचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, यात चार जण गंभीर जखमी झालेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, या घरात पोटमाळ्याचे काम सुरू होते. यादरम्यानच हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

तसेच मलबा तातडीने काढण्यात येत असून बचाव कार्य सुरू आहे. यातील जखमींना राजावडी रुग्णालयात दाखल केले आहे. तर, गंभीर रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल केलं आहे.