‘त्या’ प्रकरणी सचिन-लक्ष्मण विरोधात बीसीसीआईकडे तक्रार

इंदौर : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) मध्ये एक व्यक्ति एक पद या नवीन नियमानुसार, माजी कॅप्टन सौरव गांगुली नंतर आता सचिन तेंडुलकर आणि व्ही व्ही एस लक्ष्मणबद्दल तक्रा करण्यात आली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या एका सदस्याने नुकतीच सचिन आणि लक्ष्मण यांच्याविरोधात बीसीसीआय लोकपालकडे तक्रार केली आहे, ईमेल द्वारे ही तक्रार करण्यात आली आहे असे समजत आहे.

बीसीसीआय लोकपालाकडे करण्यात आलेल्या या तक्रारीत म्हटलं आहे की, “सचिन तेंडुलकर आणि व्ही व्ही एस लक्ष्मण हे दोघेही बीसीसीआयची क्रिकेट अ‍ॅडवायजरी कमिटी आहेत. या कमिटीद्वारे टीमच्या कोचचे सिलेक्शन केले जाते. याशिवाय तेंडुलकर हे आईपीएल फ्रेंजाईजी टीम मुंबई इंडियन्सचे आयकॉन आहेत. शिवाय लक्ष्मण सनराईजर्स हैद्राबादचे मेंटोर आहेत. सोबतच ते कमेंटेटर देखील आहेत. हे सर्वच संविधान आणि नियमांचे उल्लंघन करत आहेत. “असे म्हटले आहे.

याशिवाय तक्रारकर्त्याने, या प्रकरणी लवकर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. दरम्यान गांगुली प्रकरणी लोकपालांनी तपासदेखील सुरु केला आहे.