पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असताना शुटींग केल्याप्रकरणी एकाला अटक

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन

अदखलपात्र गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि संशयित यांना समोरासमोर बोलावून समज देत असतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करुन शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी एकावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरी अशोक जाधव (वय 29, रा. विटा रोड, तासगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगावमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सोमवरी (दि.१८) हरी जाधव याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. जाधव हा महिलेने त्रास देत असल्यामुळे मुलीने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात समज देण्यासाठी बुधवारी (दि.२०) सकाळी पावणे आकराच्या सुमारास फिर्य़ादी महिला आणि हरी जाधव यांना बोलावून घेतले होते. त्यावेळी महिलेला आणि तीच्या पतीला समजावून सांगत असताना हरी जाधव याचे मोबाईलमध्ये शुटींग करत होता. तो शुटींग करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्यावर शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.