‘या’ कारणामुळं अजित पवारांचा ‘इथं’ थेट फोन आणि…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती शहर आणि परिसरात डेंग्युच्या रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्वरीत यंत्रणेला सूचना दिल्या. यानंतर आजच डेग्यू निर्मूलनाच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्याचे दिसत आहे.

अजित पवारांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनीच अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिले की, डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. खुद्द मुसळेंनी एकाच दिवसात जवळपास 21 रुग्णांना पुण्याला हलवण्यासाठी सहकार्य केले. मुसळेंनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर अजित पवारांनी दिल्लीतूनच संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.

डेंग्यू निर्मूलनासाठी पवारांनी सूचना केल्यानंतर आज आरोग्य, नगरपालिका व इतर संबंधित विभागात हालचाली झाल्या आणि उपाययोजनांना प्रारंभ झाला. पुण्यात विविध रुग्णालयांचे सहाकार्य मिळावे म्हणून बारामतीकरांनी सुनीलकुमार मुसळेंना विनंती केली होती. त्यानुसार मुसळेंनी रुग्णांना ताबडतोब उपचार मिळतील याची व्यवस्था केली. याशिवाय रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत पवारांनाही सांगितलं. यानंतर पवारांनी तात्काळ पाऊल टाकले.

Visit : Policenama.com