सर्वसामान्यही आता खरेदी करू शकणार One plus चा 12 GB रॅम आणि 5G चा ‘हा’ फोन ! जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ‘One plus’ कंपनीचा मोबाईल म्हटलं की सामान्य माणूस जरा विचार करतोच. कारण One plus मोबाईल बरेच महाग असतात. पण आता सगळ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. या कंपनी लवकरच तरुणांना आणि सर्वसामान्यांना परवडेल असा मोबाईल लवकरच बाजारात आणत आहे. चला तर जाणून घेऊया या मोबाईलबद्दलची अधिक माहिती.

हा फोन (one plus Nord) दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे, आकाशी आणि काळा. तसेच त्यामध्ये युझरला Qualcomm Snapdragon 765G प्रोसेसर मिळणार आहे. या नवीन One plus फोन मध्ये दोन प्रकार उपलब्ध असणार आहेत पहिला 8 GB रॅम+128 GB इंटरनल मेमरी आणि दुसरा 12 GB रॅम +256 GB स्टोरेज. याशिवाय 5G सपोर्ट असणारा हा मोबाईल आहे. Android 10 इनबिल्ड असणार आहे.

याचा कॅमेरा अगदी उत्तम असणार आहे. हा फोन क्लिअ‍ॅरिटी आणि फोकसच्या बाबतीत बाकीच्या कंपनीच्या तुलनेत उत्कृष्ट असणार आहे. या फोनला 32+8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 8+48+5+2 प्रायमरी 4 कॅमेरा मिळणार आहेत. या नवीन फोनची किंमत 6 GB +64GB घेणार असाल तर 24,999 रुपये आहे. तर 8GB फोनची किंमत 27,999 आणि 12GB फोनची किंमत 29,999 आहे. हा फोन तुम्ही अमेझॉनवरून खरेदी करू शकता. येत्या4 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टला याची दुपारी 12 वाजता विक्री सुरू होईल.