साक्रीरोडवर ‘डांगडिंग’ करणाऱ्या मद्यपी पोलीस कर्मचाऱ्याला उपविभागिय अधिकाऱ्यांनी घेतलं ताब्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील साक्रीरोड जवळील देशी दारु दुकाना जवळील एटीएम मशीन ओट्यावर मद्यपी पोलीस कर्मचारी व सोबती असे धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलीस उपअधिकारी सचिन हिरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले व साक्री रोड भागात गोंधळ घालणाऱ्या एका पोलीस कर्मचारी व अन्य एकाला ताब्यात घेतले.

यावेळी चौकात बघ्यांची गर्दी गोळा झाली होती. यावेळी अधिकारी यांचे समोर कर्मचारी याने बाचाबाची केली. दोघे जणांना उपविभागिय पोलीस अधिकारी यांनी शासकीय वाहनात बसवुन शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी कर्मचारी याने गोंधळ घातला. अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी हा गोंधळ बघितला.

उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दोघांची वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले.पोलीस कर्मचारीचे नाव कळु शकले नाही. उशीरा पर्यत गुन्हा नोंद करण्याते काम शहर पोलीस ठाण्यात सुरु होते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like