एकाच राञीत सात घरे फोडली व हजारोंचा माल चोरट्यांनी लंपास केला

धुळे :  पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील तालूक्यात चोऱ्यांचे सञ सुरूच आहे.पोलीस हतबल झाले आहे.असा आरोप ग्रामस्थ करीत आहे. तालूक्यातील चोऱ्या पोलीसांसमोर डोके दुखी ठरत आहे. याबाबत मिळालेली माहिती तालूक्यातील शिरपूर जवळील करवंद येथे चोरट्यांनी मध्यराञी सात ते आठ घरे फोडून घरातील सोने,चांदी,दागिने,रोख रक्कमसह हजारो रुपयांवर डल्ला मारत गावातून पोबारा केला.

याबाबत मिळलेली माहिती अशी की करवंद गावात एकाच राञी तीन गल्लीत प्रवेश केला. खाटीक गल्ली, पाटील गल्ली, विठ्ठल मंदिर परिसरातील सात, आठ घरांचा कडीकोंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील कपाट, साहित्य फेकत सोने,चांदी,हजारो, रुपयांचा माल चोरुन गावातून पोबारा केला. या चोरी बाबत सकाळी परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले.पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.

चोरीची माहिती पोलीसांनी दिली. माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी चोरी बाबत माहिती मिळावी तपास दृष्टीने श्वान पथक,ठसे तज्ञ अधिकारी,कर्मचारी यांची मदत घेतली. परिसरात सिसीटिव्ही द्वारे काही अधिक माहिती मिळते का चोरटे किती होते. कुठल्या रस्त्याने गावात आले नंतर कुठल्या मार्गाने पोबारा केला या सर्व बाबीची माहिती पोलीस घेत आहे. चोरी बाबत उशिरा पर्यत शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
तपास एस.बी.वाघ करीत आहे.