एकतर्फी प्रेमातून मुलीला शाळेत मारहाण, नैराश्येतून मुलीची आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन विद्यार्थीनीला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आरोपी मुलाचं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. तो तिला त्रास देत होता. तो सतत तिच्या मागे लागत असल्याने पीडीत तरुणीने त्याला दाद दिली नाही. नंतर तरुणाने भावाच्या मदतीने तिला मारहाण केली होती. याचा तिला प्रचंड धक्का बसल्याने तिने याच धक्क्यातून विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.

आकाश राठोड आणि प्रकाश राठोड असे आरोपींची नावे आहेत. विद्यार्थीनीने लग्नास नकार दिला म्हणून आरोपी आकाश आणि त्याच्या भावानं मुलीला तिच्या शाळेत जाऊन मारहाण केली होती. त्याच धक्क्यातून या विद्यार्थीनीनं आत्महत्या केली. आत्महत्या करणारी पीडित विद्यार्थीनी गावातील एका कनिष्ठ विद्यालयात शिकत होती. तिच्यावर गावातील आकाश राठोड (वय-22) याचे एकतर्फी प्रेम होते.

आकाश राठोड याने तरुणीला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, तिने विद्यार्थीनीने नकार दिला होता. 23 तारखेला आकाशला नकार दिल्यानंतर 24 तारखेला आकाश आणि त्याचा भाऊ प्रकाश या दोघांनी तिच्या शाळेत गेले. आकाशचा भाऊ प्रकाशने तिला तू माझ्या भावाला लग्नाला नकार का दिला असा जाब विचारला. जाब विचारत असतानाच त्याने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. या अपमानास्पद पद्धतीने झालेल्या मारहाणीमुळे आणि शाळेत सर्व विद्यार्थ्यांसमोर झालेल्या बदनामीमुळे मुलगी प्रचंड व्यथित झाली. यातूनच तिने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. हिंगाणा पोलिसांनी आकाश आणि प्रकाश राठोड विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/