एकतर्फी प्रेमाचा अंत ! मुलीचा गळा चिरला अन् तरूणानं विहिरीत घेतली उडी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने एका अल्पवयीन मुलीवर आत्मघाकी हल्ला करून स्वत:चे आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना यवतमाळमधील आर्णी तालुक्यात घडली आहे. तरुणाने एकतर्फी प्रेमातून 17 वर्षाच्या तरुणीवर जीवघेणा हल्ला करून विहिरीत उडीमारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.

गोलू उर्फ अमन जाधव नावाच्या तरूणाने एका 17 वर्षीय तरुणावर शनिवारी दुपारी जीवघेणा हल्ला करून स्वत: विहिरीत उडी मारून स्वत:चे आयुष्य संपवले. गोलूने मुलगी घरी एकटी असताना तिच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी गोलू तेथून फरार झाला. जखमी मुलगी ही पुण्यातील एका महाविद्यालयात 12 वी मध्ये शिक्षण घेत होती. होळीच्या सणानिमित्त ती गावात आली होती. त्यावेळी अमन याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. जखमी मुलीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजन असल्याचे सांगण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलीवर हल्ला केल्यानंतर अमन याने घटनास्थळावरून पळ काढला. त्याने घटनेनंतर काही तासातच एका विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीच्या घरी धाव घेत अमनचा शोध सुरु केला. मात्र, अमन याने केळझरा तांड्याजवळ असलेल्या शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.