एकतर्फी प्रेमातून तरुणीवर धारधार शस्त्राने वार 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

एकतर्फी प्रेमातून मुंब्रा बायपास परिसरातील सम्राटनगर येथील एका तरुणीवर धारदार शस्त्राने आठ वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला तरुणीच्या सख्या मामाच्या मुलानेच केला असल्याची तक्रार जखमी तरुणीने मुंब्रा पोलिसांकडे केली आहे. सध्या तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
[amazon_link asins=’B01DF29XFW,B00TFGVULI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0731ab76-ba91-11e8-8853-5befd0b85760′]

या प्रकरणी करण सायबण्णा हुले (२५) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून हल्ला केल्यानंतर तो पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुंब्रा बायपास परिसरामध्ये पीडित मुलगी राहत असून तिचे वडील ठाणे महापालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात. पीडित मुलीच्या मामाचा मुलगा अनेक वर्षांपासून तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत होता. परंतु तो कामधंदा करत नसल्याचं आणि त्याला व्यसन असल्याचं कारण देत या मुलीने त्याच्या प्रेमाला नकार दिला होता.
[amazon_link asins=’B00TFGWAA8,B01MSYQWNY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0cb82921-ba91-11e8-8a5c-a553954718af’]

ही तरुणी रविवारी सायंकाळी घराजवळ बसलेली असताना आरोपीने तिच्याशी पुन्हा हाच प्रश्न विचारत हुज्जत घातली. मात्र तिने पुन्हा त्याच्या प्रेमास नकार दिल्यामुळे रागाच्या भरात त्याने धारधार शस्त्राने तिच्यावर आठ वार केले. यावेळी मुलीने मदतीसाठी आरडाओरडा सुरू करताच तिचे वडील आणि बहिण तिच्या मदतीला धावले. तोपर्यंत करण तेथून फरार झाला होता. त्यानंतर या तरुणीला तिच्या वडिलांनी तात्काळ परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी