यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन –   एकतर्फी प्रेमातून तरुणाने गावातील तरुणीच्या घरी जाऊन तिचा गुप्तीने भोसकून निर्घृण खून केला आहे. पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रामपूरनगर येथे शनिवारी (दि. 15) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुवर्णा अर्जुन चव्हाण ( वय 21) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आकाश श्रीराम आडे (वय 25) असे आरोपीचे नाव आहे.

खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत सुवर्णा दोघेही रामपूरनगर या गावात राहत होते. आकाश हा सुवर्णावर एकतर्फी प्रेम करत होता. दरम्यान सुवर्णाचे आई, वडील व भाऊ काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आरोपीने हीच संधी साधून शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गावातील सुवर्णाचा घरी पोहचला. यावेळी दोघात वाद झाला. त्यातूनच आकाशने सुवर्णाच्या पोटात गुप्तीने वार केले. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.