आता महादेव जाणकारांच्या ‘रासप’ला हव्यात फक्त ‘एवढ्या’ जागा !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – महायुतीच्या जागांचा घोळ अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नसताना मित्र पक्षांनी आपल्या जागांसाठी चढाओढ सुरु केली आहे. राष्ट्रीय पक्षाने भाजपकडून आपल्याला ५७ जागा मिळाव्यात अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकार यांनी केली होती.

मुंबई येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलताना जानकरांनी आपला विधानसभेचा आकडा बदलत १४ जागांची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीत लोकसभाप्रमाणेच महायुती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र आधी घटकपक्षांच्या जागांचा निर्णय घेऊ, त्यांनतर भाजप – शिवसेना जागावाटप करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री यांनी केला आहे.

गेल्यावेळी २ जिल्हा परिषद सदस्य असताना आम्हाला ६ जागा दिल्या होत्या. आता आमच्याकडे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. आमच्या पक्षाची ताकद पाच वर्षात मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आम्हाला किमान १४ जागा तरी देण्यात यावेत असे जानकर म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचा खुलासा सुद्धा यावेळी जानकर यांनी केला.

जानकरांनी याआधी ५७ जागांची मागणी केली होती मात्र यावेळी बोलताना ती कमी करून त्यांनी १७ जागांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –