पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलांना लुटणारा सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्यास खडक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई काशेवाडी येथील मोकळ्या जागेत करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मंगळसुत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इरफान उर्फ डंगाज ख्वाजा शेख (वय-२५ रा. राजीव गांधी वसाहत, काशेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. याप्रकरणी रंजना जयकुमार शहा (वय-६८ रा. जोगेश्वरी हौसिंग सोसायटी, पुणे) यांनी २७ एप्रिल २०१९ रोजी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रंजना शहा या शुक्रवार पेठेतील पंचमुखी मारूतीचे दर्शन घेऊन घरी परतत असताना आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून चोरून नेले होते. या गुन्ह्यातील आरोपी इरफान उर्फ डंगाज ख्वाजा शेख काशेवाडी येथील १० नंबर कॉलनीसमोरील मोकळ्या जागेत असल्याची माहिती आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार डंगाज शेख याला सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्यीच कबुली दिली.

आरोपी इरफान उर्फ डंगाज ख्वाजा शेख याच्यावर खडक पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी करणे, शस्त्र बाळगणे, तडीपारीच्या आदेशाचा भंग करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे असे २३ गुन्हे दाखल आहेत. त्याला परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त यांनी दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.

ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी विठ्ठल पाटील, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, महावीर दावणे, आशिष चव्हाण, राकेश क्षिरसागर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, प्रमोद नेवसे, रवी लोखंडे, इम्रान नदाफ, योगेश जाधव, विशाल जाधव, हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.

दम्याच्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी, अन्यथा वाढू शकतो त्रास

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट