कोंढवा परिसरात एक हजार वृक्षांची लागवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व त्यांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे हा संदेश देत कोंढवा परिसरातील विविध भागात एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी वानवडी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त देविदास पाटील, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड, नगरसेविका परवीन हाजी फिरोज शेख, नगरसेवक हाजी गफूए पठाण, ऑल कोंढवा फौंडेशनचे अध्यक्ष हाजी फिरोज शेख, बसित शेख, इम्तियाज शेख, शबाना शेख, समीनाशेख, हुसेश पाशापुरी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने तब्बल १३ कोटी वृक्षारोपण करण्याचे ठरविण्यात आले आहे. यातील साठ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट पुणे मनपाला देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोंढवा येथील प्रभाग क्रमांक २७ मधील नगरसेवक परवीन हाजी फिरोज शेख व हाजी गफूर पठाण यांनी कोंढवा परिसरात एक हजार झाडे लावून खारीचा वाटा उचलला आहे. शिवनेरी नगर, खडी मशीन चौक, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, आनंदवन या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली.

ही झाडे लावून या झाडाची योग्य पद्धतीने देखभाल करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणार आहे, असे यावेळीं परवीन शेख व गफूर पठाण यांनी सांगितले. पठाण म्हणाले मनपा तर्फे मनपाच्या जागेत व खाजगी जागे व सोसायटीमध्ये झाडे लावण्यासाठी एक ते आठ फुटी जेसीबीतून खड्डे व झाडे मोफत देण्यात येईल.