भाजपविरोधात एकच महाआघाडी हवी : खासदार राजू शेट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षसंघटनांनी एकत्र यायला हवे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका असून, तिसरी आघाडी नव्हे तर भाजपच्या विरोधात एकच महाआघाडी सर्व पक्षांनी एकत्र येऊन निर्माण होणे आवश्यक आहे. त्या प्रयत्नांबाबत आपली भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत अडीच तास चर्चा झाली, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी पत्रकारांना दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0260c2ab-c9fb-11e8-8544-451d9dc469b9′]

खा. शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात दादरच्या हिंदू कॉलनीतील राजगृहमध्ये चर्चा झाली. या बैठकीस लोकतांत्रिक जनता दलाचे आ. कपिल पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर उपस्थित होते. या बैठकीबाबत माहिती देताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे दोन पर्याय आहेत. संपूर्ण देशभरातील शेतकरी संघटनांना एका व्यासपीठावर आणून आमचा संघर्ष सुरू आहे. त्या सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांची भूमिका अद्याप स्पष्ट व्हायची आहे. दुसरे महाराष्ट्राचा विचार केला तर कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेतून हद्दपार करायचे या भूमिकेसोबत आमची पक्षसंघटना आहे. त्यामुळे तिसरी आघाडी नको तर, दोन्ही काँग्रेससोबतच महाआघाडी निर्माण करून त्यात सर्वांना सामावून घेण्याचा सकारात्मक विचार आहे.

नाना पाटेकर यांच्या विरोधात अखेर तनुश्रीची पोलिसांकडे तक्रार

भाजपसारख्या शेतकरीविरोधी, जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी पुरोगामी विचाराच्या धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र आल्या पाहिजेत. लोकसभेच्या काही जागांसाठी आमचा आग्रह कायम आहे. एकत्रित बैठका घेऊन तडजोडी होतील. भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी करावी, असे खा. राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी नुकतीच औरंगाबाद शहरात बहुजन वंचित आघाडीची घोषणा केली होती.

[amazon_link asins=’B001FWYGJS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2c59e3aa-c9fc-11e8-98d9-47deeaf74d2a’]