तीनशे गावांमध्ये एक गाव एक गणपती : सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून पोलिस दलाने एक गाव एक गणपतीसाठी आवाहन केले होते. त्याला यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी तीनशे गावांमध्ये एक गाव एक गणपती योजना राबवली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी अधिक असल्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b59247a-b35e-11e8-a428-179dd3674217′]

उशीरा विसर्जन करणार्‍या मंडळांना सूचना दिल्या आहेत. विसर्जन करताना कोणीही कितीही दिरंगाई केली तरी विसर्जन होणारा शेवटचा गणपती हा पोलिसांचाच असेल असेही शर्मा यांनी यावेळी सांगितले. उत्सव काळात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांसह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या एक हजार होमगार्डही नेमण्यात येणार आहेत, असेही शर्मा यांनी सांगितले.

जाहिरात

गणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उपद्रवकारक ठरणार्‍या दीडशेजणांवर उत्सव काळात हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई उत्सवापुरतीच मर्यादित राहणार असली तरी गुन्हेगारांवर पोलिसांचा कायमस्वरूपी वॉच राहणार असल्याचेही अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

जाहिरात

गणेशोत्सव काळात ज्या युवकांची विचारधारा सकारात्मक आहे. ज्यांच्यात सामाजिक काम करण्याची धडपड आहे अशा सुमारे पन्नास युवकांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षकांना तसे अधिकार असून त्यांना रितसर ठराविक गणवेश आणि ओळखपत्र देण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात असे 50 अधिकारी नेमण्यात येणार आहेत. यासाठी यादी बनवण्याचे काम सुरू आहे. त्यांना अधिकार्‍याचा दर्जा असणार आहे, असेही अधीक्षक शर्मा यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या
सहाय्यक निरीक्षकासह महिला उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाशी सलग्‍न 

बनावट नाेटा टाेळीची पाळेमुळे पश्चिम बंंगालपर्यंत : एटीएस पथक सांगलीत दाखल

यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट 

कमर बाजवांचा बाजा मोदी वाजवणार का? : शिवसेना