‘डांगडिंग’ ! मध्यरात्री छतावर एक महिला 2 अर्धनग्न तरूणांसह अन् अश्लील ‘चाळे’, पुढं झालं ‘असं’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बुधवारी रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्हा रुग्णालयाच्या छतावर नशा करून एक महिला आणि दोन तरूणांनी अर्धनग्न होऊन अश्लील चाळे केल्याचा प्रकार सोमवारी(दि- 4) समोर आला होता. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर शुक्रवारी(दि- 8) रोजी म्हणजेच 6 दिसांनी या प्रकरणी एक महिला आण दोन तरुणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळाळेल्या माहितीनुसार, सदर दोन तरुण खासगी रुग्णवाहिकेवर चालक आहेत. अंकुश विष्णु नैराळे(वय 34, रा. पिठी नायगाव, ता. पाटोदा) आणि अशोक अभिमान लांडगे(वय 29, रा. वडगाव गुधा, ता. बीड) अशी या दोन्ही तरुणांची नावे आहेत. या दोघांसोबत असणारी महिला 26 वर्षांची आहे. ती भूम तालुक्यातील घाटनांदूरमधील रहिवासी आहे.

अशोक आणि अंकुश यांनी एका महिलेसह मिळून नशेत जिल्हा रुग्णालयाच्या छतावर जाऊन अर्धनग्न होत अश्लील चाळे केले. या प्रकरणी म्हणजेच घटनेच्या सहाव्या दिवशी जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी फिर्याद दिली. यानंतर भादवि कलम 296, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. बीड शहर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like