पुण्यातील आपटे रोडवर झाडाची फांदी पडून दिव्यांग महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – झाडाची फांदी डाेक्यात पडून एका 48 वर्षीय दिव्यांग महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आपटे रस्त्यावर ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेकडून नेहरु सांस्कृतिक केंद्रामध्ये दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक बाेलावली हाेती. या बैठकीला विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. त्यावेळी प्रहार क्रांती अपंग संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या जयश्री जगताप या इतर सहकाऱ्यांसाेबत चहा पिण्यासाठी संताेष बेकरी जवळील एका चहाच्या दुकानावर आल्या हाेत्या. त्यावेळी त्या ठिकाणच्या एका झाडाची कुजलेली फांदी त्यांच्या डाेक्यात काेसळली. इतर सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. जगताप या दिव्यांग हाेत्या.

ज्या ठिकाणची फांदी पडली ती फांदी सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून अर्धी कापण्यात आली हाेती, उरलेली फांदी कुजून पावसाच्या पाण्याच्या ओझ्यामुळे काेसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याप्रकरणी डेक्कन पाेलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

 

You might also like