कौतुकास्पद ! 1 वर्ष 9 महिन्यांच्या ‘या’ चिमुकल्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसह अनेक रेकॉर्डमध्ये झाली नोंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादच्या एका चिमुकल्यानं कमाल केली आहे. या चिमुकल्याच्या तल्लख बुद्धीमुळं त्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. हा चिमुकला अवघं 1 वर्ष आणि 9 महिन्यांचा आहे. त्याच्या कामगिरीनं सर्वच चकित झाले आहेत. आदिथ विश्वनाथ गौरीशेट्टी असं या मुलाचं नाव आहे. आदिथच्या कामगिरीमुळं त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सोबत आदिथच्या नावे इतरही अनेक रेकॉर्डची नोंद आहे.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इतर दोन राष्ट्रीय रेकॉर्ड्समध्ये आदिथच्या नावाची नोंद आहे. आदिथची शार्प मेमरी पाहून अनेकजण भारावून गेले आहेत. एवढ्या लहान वयात अनेक गोष्टीचं ज्ञान कसं असू शकतं. सर्व गोष्टी कशा लक्षात राहू शकतात. असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. विवध देशाचे झेंडे, कारचे लोगो, अल्फाबेट्स, देवदेवतांची नावं यासह अनेक गोष्टी आदिथ क्षणात ओळखतो.

आदिथची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
घरातील विविध उपकरणं, रंगांची नावं, प्राणी, पक्षांची नावं, फळं, भाज्या यासह असंख्य गोष्टी त्याच्या लक्षात राहतात. शार्प मेमरीसाठी आदिथ लोकप्रिय झाला आहे. अवघड गोष्टींची उत्तरं तो अत्यंत सहज देतो. त्याची बुद्धिमत्ता पाहून सर्वांनाच कौतुक वाटत आहे. या गुणांमुळंच त्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. आदिथच्या आईवडिलांनीही मुलाचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे.