बिहार काँग्रेस मुख्यालयावर Income Tax चा छापा, लाखो रुपये जप्त

पटना : वृत्तसंस्था : बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. आयकर विभागाच्या (income tax) टीमने पटनामधील (patana) काँग्रेस कार्यालय (congress headquarters) सदाकत आश्रमामध्ये छापा (raid) मारला असल्याचे सांगण्यात येत आहे. असे सांगितले जातेय की, काँग्रेस कार्यालयात पोहोचलेल्या इनकम टॅक्स विभागाच्या पथकाने लाखो रुपये जप्त केले आहेत. सदाकत आश्रमात नेत्यांची चौकशी सुरु आहे. याच दरम्यान काँग्रेस कार्यालयावर नोटीस देखील लावण्यात आली आहे. हा छापा साधरण एक तास सुरु होता, यामध्ये लाखो रुपयांच्या देवाण-घेवाणीत अनेक नेत्यांची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर काँग्रेस पक्षाशी संबंधित काही मूळचे बिहारच्या असलेल्या स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या संशयास्पद देवाण-घेवाणबाबत त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या माध्यमातून काळा पैसा (Black Money) देवाण-घेवाणीचा आरोप आहे. ही माहिती देखील समोर आली आहे की, बिहारचे काही स्थानिक नेते व तेथील काही स्थानिक लोकांमध्ये लाखो कोटी रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या प्रकरणात इनकम टॅक्स विभागाची टीम चौकशी करणार आहे.

You might also like