मार्केटमध्ये आलाय OnePlus चा खास ‘टेक्नॉलॉजी’वाला ‘स्माटफोन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने सीईएस 2020 कार्यक्रमात एक खास टेक्निकवाला कॉन्सेप्ट वन स्मार्टफोन McLaren एडिशन सादर केला आहे. कंपनीने या डिव्हाइससाठी ऑटोमोबाईल कंपनी McLaren सोबत भागीदारी केली आहे.

या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बॅक पॅनल इलेक्ट्रॉनिक. म्हणजेच कॉन्सेप्ट वनचा बॅक कॅमेरा फोटो काढल्यांनंतर आपोआप लपविला जातो. त्याच वेळी, कंपनीने असा दावा केला आहे की, हे तंत्रज्ञान कॅमेरा लपविण्यासाठी केवळ 0.7 सेकंद घेते. दरम्यान, कंपनीने हा फोन अद्याप अधिकृतपणे लाँच केलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वनप्लस कॉन्सेप्ट वन मॉडेलमध्ये वापरलेले तंत्रज्ञान मॅक्लारेन 720 एस स्पायडर स्पोर्ट्स कारद्वारे प्रेरित आहे. इलेक्ट्रॉनिक ग्लास वापरुन ही कार विशेष हार्ड-टॉपने बनविली आहे. या व्यतिरिक्त लोकांना या डिव्हाइसमध्ये लेदर पॅनेल मिळेल. त्याच वेळी, कंपनीने अद्याप या डिव्हाइसच्या लाँचिंगची तारीख आणि तपशील याबद्दल माहिती दिली नाही.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/