OnePlus आणणार 120 हर्ट्स स्क्रीनचा ‘स्मार्टफोन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोनच्या जगतात आपला वेगळा ठसा उमटवणारी कंपनी OnePlus आज आपला सर्वात अ‍ॅडव्हान्स स्क्रीन १२० हर्ट्स बाजारात आणणार आहे. कंपनी पहिल्यांदाच या नव्या स्क्रीनला जगासमोर आणणार आहे. हे नवीन तंत्रज्ञान सुरू झाल्यामुळे मोबाईल स्क्रीन जगतात एक मोठी खळबळ उडवून देईल अशी आशा आहे.

काय आहे १२० हर्ट्ज स्क्रीन?
आपण खरेदी केलेल्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये स्क्रीन डिस्प्ले हर्ट्जनुसार मोजले जाते. सध्याच्या बाजारामध्ये स्मार्टफोन स्क्रीनची गुणवत्ता केवळ ६० ते ९० हर्ट्जपर्यंत आहे. असे म्हटले जात आहे की १२० हर्ट्झच्या डिस्प्लेमध्ये क्वाड एचडीचा उत्कृष्ट डिस्प्ले असेल. फोन चालविताना स्क्रीनची गुणवत्ता अधिक चांगली होईल. असेही सांगण्यात येत आहे की २०२० मध्ये, वनप्लस आपल्या सर्व नवीन स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ ओएलईडी डिस्प्ले स्क्रीन स्थापित करेल.

सॅमसंग लवकरच हे तंत्रज्ञान देखील आणू शकेल
सूत्रांचे म्हणणे आहे की, वनप्लसच्या या लॉन्चच्या पार्श्वभूमीवर सॅमसंगही १२० हर्ट्झ स्क्रीन वापरण्याच्या विचारात आहे. कंपनी आपल्या नवीन गॅलेक्सी एस -११ मध्ये हे तंत्रज्ञान वापरू शकेल.

चित्रपट पाहण्याची मजा होईल दुप्पट
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बाजारात नवीन १२० हर्ट्झच्या आगमनानंतर स्क्रीनच्या गुणवत्तेत प्रचंड क्रांती येणार आहे. या स्क्रीनवरील क्वाड एचडी + डिस्प्लेमुळे मोबाइलमध्ये चित्रपट पाहण्याची मजा दुप्पट होणार आहे. स्क्रीन खुप स्पष्ट आणि स्मुथ होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/