ONGC CMD Alka Mittal | अलका मित्तल यांच्या हाती ONGC ची कमान ! एकेकाळी ‘ट्रेनी’ म्हणून ज्वाईन केली होती सर्वात मोठी ऊर्जा कंपनी, आता बनल्या CMD

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ONGC CMD Alka Mittal | सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ONGC) अलका मित्तल (ONGC CMD Alka Mittal) यांची कंपनीचे अंतरिम अध्यक्ष (Interim Chairman) आणि व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) म्हणून नियुक्ती केली आहे. देशातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू उत्पादक कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. 31 डिसेंबर रोजी निवृत्त झालेल्या सुभाष कुमार (subhash kumar) यांच्यानंतर अलका मित्तल (ONGC CMD Alka Mittal) या हे पद सांभाळतील.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने Department of Personnel and Training (DOPT) 3 जानेवारी रोजी घोषित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, “मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD), मंत्रालयाच्या पदाचा कार्यभार अलका मित्तल यांच्यावर सोपवण्याच्या प्रस्थावला मंजुरी दिली आहे. “अल्का मित्तल 1 जानेवारी 2022 पासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत ONGC च्या अंतरिम अध्यक्षपदी राहतील,” असे आदेशात म्हटले आहे.

सुभाष कुमार यांची जागा घेणार अलका मित्तल –

सुभाष कुमार हे ONGC चे वित्त संचालक (Finance Director) होते जे 31 डिसेंबर 2021 रोजी ते निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी अलका मित्तल यांना ओएनजीसीच्या CMD बनवण्यात आले आहे. सुभाष कुमार यांना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये CMD पद देण्यात आले होते.

अलका मित्तल 1985 मध्ये ओएनजीसीमध्ये रुजू झाल्या –

अलका मित्तल यांनी 1985 मध्ये ओएनजीसीमध्ये ट्रेनी म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. अलका मित्तल या अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर आहेत आणि HRM मध्ये एमबीए आहेत. कॉमर्स आणि बिझनेस स्टडीजमध्ये (commerce business studies) त्यांनी पीएचडीही (PHD) केली आहे. तसेच, अलका मित्तल 2018 पासून ONGC मध्ये HR संचालक म्हणून कार्यरत होत्या. (ONGC CMD Alka Mittal)

ONGC मध्ये या पदासाठी झाली निवड –

अलका मित्तल ONGC मध्ये HR संचालक होण्यापूर्वी ONGC मध्ये स्किल डेव्हलपमेंच्या (skill development) प्रमुख होत्या.
तसेच त्या ONGC च्या इतिहासातील पहिल्या महिला आहेत ज्यांची फुल टाइम डायरेक्टर म्हणून निवड झाली आहे.

 

 

 

ONGC भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी –

ONGC हि कंपनी भारतातील कच्चे तेल आणि वायू उत्पादनात 71%
योगदान देते. ओएनजीसी 20 देशांमध्ये अझरबैजान, बांगलादेश, ब्राझील, कोलंबिया, इराक, इस्रायल,
इराण, कझाकस्तान, लिबिया, मोझांबिक, म्यानमार, नामिबिया,
रशिया, दक्षिण सुदान, सुदान, सीरिया, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला,
व्हिएतनाम आणि न्‍यूजीलैंडमध्ये 41 प्रकल्पामध्ये सहभागी होत आहे.
ONGC ची स्थापना 1993 मध्ये झाली आहे.

 

 

Web Title :- ONGC CMD Alka Mittal | ongc command in the hands of alka mittal was once the largest energy company joined as a trainee now cmd created history

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘शरद पवार तेव्हा म्हणाले होते मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? आता…’

Pune Crime | पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटवली 4 वाहने; प्रचंड खळबळ

Fish For Asthama Patient | माशांमुळे दम्याचा धोका होतो कमी, जाणून घ्या फायदे