लासलगाव बाजार समितीत कांद्याला हंगामातील सर्वोच्च 6891 चा भाव

लासलगाव – प्राप्तीकर विभागाकडून छापे तसेच कांदा निर्यातबंदी लादून देखील कांदा भाव खात आहे. आशिया खंडातील प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज या हंगामातील कांद्याला सर्वोच्च संस्था ६८९१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.१४ ऑक्टोबर रोजी कांद्याला कमाल ४८०१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.

मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात २ हजार हुन अधिकची वाढ पहायला मिळाली.
अतिवृष्टीमुळे राज्यातील नवीन कांदा पिकाचे झालेले नुकसान आणि तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध असलेला जुना कांदा यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने कांदा आता ७ हजारांच्या घरात पोहचला आहे.

येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर ४१० वाहनांतुन कांदा ४७०० क्विंटल आवक होऊन कांद्याला कमीत कमी १५०० सरासरी ६२०० तर जास्तीत जास्त ६८९१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.