कांद्याची 4 दिवसात 1400 रुपयांची घसरण, बळीराजा ‘हतबल’

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन –   गेल्या चार दिवसात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चौदाशे रुपये इतर लाल कांद्याच्या दरामध्ये अकराशे रुपयाची घसरण दिसून आल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी होऊन देखील बाजारात घसरण दिसत आहे . तीन वेळेस कांद्याच्या पेरण्या करून अवकाळीचा फटका सहन करत शेतकऱ्यांनी कांदा टिकविला मात्र भाव मिळत नसल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

सोमवारी चार हजार रुपये प्रति क्विंटल ने विक्री झालेला कांदा आज पंचवीस रुपयांच्या घरात आल्याने कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.आवक कमी होऊन देखील भावात मोठी घसरण का होत आहे असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. राजस्थान,गुजरात, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश या राज्यात कांद्याचे पीक बाजारात येत असल्याने स्थानिक बाजारातील मागणी पूर्ण होत आहे यामुळे बाजारात घसरण पाहायला मिळत आल्याची कांदा व्यापाऱ्यांचे चांगले आहे.

गेल्या वर्षभरापासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस,वादळ तर बोगस बियाणे अशा अनेक संकटांना तोंड देत असलेल्या बळीराजाच्या चिंता अद्यापही कमी झालेल्या नाहीत. अनेक संकटातून सावरत असताना पुन्हा एकदा कांद्याचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. कांद्याचे भाव यापुढेही भाव सुधारण्याऐवजी पुन्हा घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ४५८ क्विंटल आवक होऊन किमान १०९२,कमाल २५१५ तर सरासरी २००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर लाल कांद्याची ५०९२ क्विंटल आवक होऊन किमान ९१०,कमाल २९२२ तर सरासरी २३२५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.