Onion Oil Benefits | केस गळणे आणि कोंड्याच्या समस्येतून मुक्त करणार घरी बनवलेल्या कांद्याचं तेल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Onion Oil Benefits | काय आपण केस गळण्याच्या आणि कोंड्याच्या (Dandruff) चिंतेने ग्रस्त आहात? मात्र, आता फारसे काळजी करण्याचे कारण नाही. कारण कांद्याचे घरी बनवलेले तेल (Onion Oil Benefits) आता ही समस्या घालवणार आहे. कारण संशोधकांच्या आणि त्वचा तज्ज्ञांच्या मते कांद्यात डायट्री सल्फर हे रसायन असते. हे केसांसाठी खुप पोषक असते. घरी बनवलेल्या कांद्याच्या या तेल लावल्यामुळे (रस) केस दाट आणि मजबूत होतात.

 

केस गळणे, पातळ होणे आणि कोंड्याची समस्या ही केवळ स्त्रियांची नव्हे तर पुरूषांची ही डोकेदुखी झाली आहे. या समस्येवर त्वचेची हानी न करणारा नैसर्गिक उपाय आणि तो ही स्वस्त शोधणे हे मोठे जिकिरीचे काम झाले आहे. या परिस्थितीत कांद्याच्या रसात असलेल्या डायट्री सल्फर या रसायनाच्या वापरामुळे ही केसाची समस्या सुटणार आहे. (Onion Oil Benefits)

 

कांद्याचे फायदे –

बुरशी आणि विषाणूंविरुद्ध गुणकारी

कांद्यात असलेल्या सल्फरमुळे केस गळणे आणि पातळ होणे थांबते.

केस पांढरे होत नाही.

कांद्याच्या रसामुळे केसांची चमक वाढते.

कांद्याचा रस हा तसा गरम असल्यामुळे केसात उवा होत नाहीत.

कांद्याचे तेल बनवण्याची घरगुती पद्धतः

कांदा ठेचून ५० ग्रॅम रस तयार करा.

एका कढईत २०० मिलीग्रॅम खोबर्‍याचे तेल किंवा तीळीचे तेल घ्या.

आता कांद्याचा रस कढईत टाकून त्याची प्रथम पेस्ट करा.

आता गॅसवर मंद आचेवर थोडं उकळून घ्या.

कांद्याच्या रसाचे मिश्रण तेलापासून वेगळे होईपर्यंत उकळून घ्या.

एका स्वच्छ कपड्याने हे मिश्रण तेलातून गाळून घ्या. नंतर हे एका बाटलीत ठेवा.

 

हे तेल आपण फ्रिजमध्ये आपण ४ ते ५ दिवस साठवून ठेऊ शकतो. यापेक्षा जास्त दिवस ठेवल्यास याला दुर्गंधी सुटते. त्यामुळे हा रस शक्यतो ताजा करून वापरावा. हे तेल केसांना १ ते २ तासच लाऊन ठेवावे. यापेक्षा जास्त वेळ ठेऊ नये. नंतर केस कुठल्याही चांगल्या शॅम्पूने (Shampoo) धुऊन घ्या. मध (Honey) किंवा कोरफडीचा (Aloe Vera) गर मिसळला तर खुप फायदा होईल.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Onion Oil Benefits | onion oil benefits suffering from hair loss try this homemade onion oil you will get many benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून; शिरवळमध्ये प्रचंड खळबळ

 

Pune Crime | फ्लॅटधारकाचा बिल्डरकडून विश्वासघात ! ओम तिरुपती डेव्हलपर्सच्या सागर अग्रवाल, इराण्णा रायचुरकर, संतोष तरस आणि ओमप्रकाश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची CM उद्धव ठाकरेंना विनंती, म्हणाले – ‘संजय राऊतांना जरा आवरा, शिवसेना संपवण्याचा…’