Onion Peel Skin Benefits : त्वचेसाठी खुप लाभदायक असते कांद्याची साल, अशाप्रकारे केला वापर तर होतील ‘हे’ 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय पदार्थ कांद्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो. कांदा वापरल्यानंतर त्याची साल टाकून दिली जाते, परंतु या सालीचा वापर करून तुम्ही केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कांद्याच्या सालीचे फायदे जाणून घेवूयात…

1 बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते –
कांद्याच्या साली रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी साली काढून हे पाणी प्या.

2 त्वचेच्या अ‍ॅलर्जीपासून बचाव –
त्वचेची अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी कांद्याच्या साली रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी या पाण्याने रोज तोंड धुवा.

3 केस बनवा सुंदर –
केस सुंदर करण्यासाठी कांद्याच्या सालीचे पाणी वापरू शकता. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात.

4 डाग जातील –
चेहर्‍यावरील डाग घालवण्यासाठी कांद्याच्या रसयुक्त सालीचा वापर करा. यासाठी सालीत हळद मिसळून डाग असलेल्या ठिकाणी लावा.

5 घशासाठी लाभदायक –
घसा घराब झाला असेल तर कांद्याच्या साली गरम पाण्यात उकळवा नंतर ते कोमट करून प्या. गळ्याशी संबंधीत समस्यांवर कांद्याच्या सालीचा हा चहा अतिशयय लाभदायक आहे.