‘या’ कारणामुळं कांदा महागला, सरकारनं सांगितलं ‘हे’ पाऊल उचलणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवसेंदिवस वाढत चालले कांद्याचे दर कमी करण्यासाठी आता केंद्र सरकार ठोस पावले उचलणार आहे. याबाबतची माहिती देताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, केंद्र सरकार लवकरच दुसऱ्या देशातून कांदा आयात करणार आहे तसेच कांद्याचे वाढते दर कमी करण्यासाठी कांदा निर्यातीवर देखील निर्बंध लादणार आहे.

यंदा पावसामुळे महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये कांद्याचे पीक कमी प्रमाणावर घेतले गेल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले. त्यामुळे या वर्षी बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. 57 हजार टन कांदा स्टाॅक मध्ये होता. परंतु त्यातील 30 % कांदा सुकला आहे. देशात सध्या कांद्याचा दर 100 रुपये किलोच्या जवळ पोहचली आहे.

सरकारने दिला हा आदेश
सरकारने अफगाणिस्तान, ईजिप्त, तुर्की आणि इरान या देशांमधून कांद्याची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांकडून कांदा विकत घेण्यासाठी सरकार महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. सरकारने कांद्याची पूर्तता करण्याचे आदेश दिलेले आहेत. यासाठी कांद्याचा स्टाॅक करून ठेवणाऱ्या मदर डेअरीला देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

नाफेडचे एमडी नाशिकला जाऊन कांद्याच्या साठ्याची पाहणी करणार आहेत आणि नाशिकवरून दिल्ली बाजारात कांदा पुरवता येईल का याबाबत विचार करणार आहेत. मंत्रालयातील दोन टीम 6 आणि 7 नोव्हेंबरला कर्नाटक आणि राजस्थानला जाणार आहेत. राजस्थान सरकारने देखील कापणीनंतर कांद्याचे उत्पादन वाढेल आणि दिल्ली बाजारातील कांद्याची मागणी पूर्ण होऊ शकणार आहे.

दिल्ली सरकारला देखील दोन टीमसोबत कर्नाटक आणि राजस्थानला जाण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच दिल्ली सरकारला सांगण्यात आले आहे की व्यापाऱ्यांना याबाबत प्रोत्साहन द्यावे.

का महागला कांदा
पावसामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली असल्याचा अंदाज कांदा व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. सोमवारी लासलगाव येथील कांद्याचे दर 10 % ने वाढून 55.50 रुपये प्रति किलोवर पोहचले होते. तसेच किरकोळ बाजारमध्ये कांद्याचा दर 80 ते 100 रुपयांवर पोहचला आहे.

Visit : Policenama.com