भारताच्या निर्णयामुळे दुबई, बांग्लादेश आणि नेपाळमधील लोकांच्या डोळ्यात ‘पाणी’, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांद्याच्या वाढत्या किंमतींचा सामना करण्यासाठी भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. भारताच्या निर्यातीवर बंदी आल्यानंतर बांगलादेश, नेपाळ, दुबई, श्रीलंका आणि मलेशियामध्ये कांद्याची किंमत दुपटीने वाढली आहे. दरम्यान, गेल्या रविवारी देशभरातील कांद्याचे दर हाताळण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने कांद्याची भारतातून केली जाणारी निर्यात रोखली होती. राजधानी दिल्लीत कांद्याचे दर ७०-८० रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर पोहोचले होते.

नेपाळ-बांगलादेश आणि दुबईचे लोक नाराज :
भारताने निर्यातीवर बंदी आणल्यामुळे बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, दुबई, मलेशिया येथे कांद्याचे दर दुप्पट झाले. बांगलादेशात एक किलो कांद्याची किंमत १२० टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जी डिसेंबर २०१३ नंतरची सर्वाधिक आहे. त्याचबरोबर श्रीलंकेत कांद्याचे दर एका आठवड्यात ५० टक्क्यांनी वाढून २८०-३०० रुपयांवर गेले.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे कांद्याची किंमत १०० रुपये किलो झाली आहे. ही १५ दिवसांपूर्वीच्या दुप्पट आहे आणि डिसेंबर २०१३ नंतरची सर्वात जास्त आहे. श्रीलंकेच्या प्रमुख शहरांमध्ये किंमती प्रति किलो ३०० श्रीलंकन रुपये (११७ भारतीय रुपये) पोहोचली आहेत. येथेही एका आठवड्यात कांदा ५० टक्क्यांनी महागला.

हे आहेत जगातील प्रमुख पुरवठादार :
कांद्याच्या किंमती वाढल्यामुळे या देशांच्या सरकारांनी कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी चीन, इजिप्त, तुर्की, म्यानमारकडे मागणी केली आहे. चीन आणि इजिप्त हे कांद्याचे प्रमुख निर्यातदार आहेत.

भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा पुरवठादार :
भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश आहे. इंडिया एग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स निर्यात विकास प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये भारताने तब्बल २२ लाख टन कांद्याची निर्यात केली.

Visit : Policenama.com