कांदा गडगडला, एका दिवसात शेतकऱ्यांना 1 कोटी 21 लाखांचा फटका. बाजार भावात 1200 रुपयांची घसरण

लासलगाव – परदेशी आयात केलेला कांदा मुंबईत दाखल होत आहे तसेच नवीन लाल कांद्याची आवकेत वाढ होत असल्याने लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कांदा गडगडल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे कांद्याच्या सरासरी बाजार भावात १२०० रुपयांची तर कमाल बाजार भावात ९०० रुपयांची प्रतिक्विंटल मागे अचानक एका दिवसात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.सोमवारच्या आवकनूसार भाजर भावात १२०० रुपयांनी घसरल्याने शेतकरी वर्गाचे एका दिवसात १ कोटी २१ लाखांचे नुकसन झाले आहे.

कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे परदेशातील कांदा चवीने भारतीयांच्या तोंडाशी उतरला नसेल मात्र परदेशी कांदा मुंबई येथे आला असून तर नवीन लाल कांद्याची आवक देशांतर्गत ठिकाणी बाजार समित्यांमध्ये येण्यास सुरुवात झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याचे व्यापारीवर्ग सांगत आहे

येथील बाजार समिती ६५० वाहनातून ७५०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती त्याला कमाल ५३०० रुपये ,सर्वसाधारण ४१५१ रुपये तर किमान १००१ रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाल्याने सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी सर्वसाधारण बाजार भावात बाराशे रुपयांची प्रतिक्विंटल घसरण झाल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा असा प्रश्न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आत्महत्येनंतर कितीही मदत दिल्यास त्याचा काय फायदा कांद्याला बाजार भाव मिळणे गरजेचे असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी माणिकराव आव्हाड बोलत आहे