‘कफ’ अन् ‘खोकला’ हैराण करतोय ? घरच्या घरीच करा ‘हा’ सोपा उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पावसाळ्यात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. या दिवसात व्हायरल इंफेक्शन वाढतं. सर्दी, खोकला येतो. कफ असलेला खोकलाही होतो. आज आपण यासाठी चांगला घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. यासाठी उत्तम उपाय आहे ते म्हणजे कांद्याचं पाणी. यानं शरीरालाही अनेक फायदे होतात. यामुळं एनर्जीही मिळते.

कसं तयार कराल कांद्याचं पाणी ?

– एक कांदा घेऊन त्याचे बारीक तुकडे करा.
– एका वाटीत पाणी घेऊन त्यात हे तुकडे भिजवा.
– आता हे पाणी 6-8 तास असंच राहू द्या.
– चवीसाठी यात थोडं मधही टाकू शकता.
– आता हे पाणी दिवसातून 2-2 चमचे 2 किंवा 3 वेळा सेवन करा.
– लहान मुलांनाही तुम्ही हे पाणी देऊ शकता. परंतु याचं प्रमाण कमी असावं.

कांद्याच्या पाण्याचे फायदे

– कांद्यात असणाऱ्या अँटी ऑक्सिडेंट्स आणि अँटी इंफ्लेमेंटरी गुणधर्मांमुळं थंडीपासूनही बचाव होतो.
– यातील थायोसल्फेट, सल्फाईड आणि सल्फोक्साईड यांचाही आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो.
– कांद्यात असणारं अँटी मायक्रोबिअल तत्व कफ शरीरातून बाहेर काढण्यास फायदेशीर ठरतात. – यामुळं फुप्फुसातून टॉक्सिन्स बाहेर पडतात.
– कांद्यामुळं इम्युन सिस्टीमही मजबूत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like