Onkar Bhojane – Vanita Kharat | ओंकार आणि वनिताच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल; वनिताच्या नवऱ्याने या भेटीनंतर दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन

पोलीसनामा ऑनलाइन : Onkar Bhojane – Vanita Kharat | काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात हिने बॉयफ्रेंड सुमित लोंढे सोबत लग्न गाठ बांधली आहे. तिच्या लग्नात महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तर तिच्या लग्नात या कलाकारांनी धमाल डान्स देखील केले होते. या डान्सचा व्हिडिओ आणि तिचे लग्नातील फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते. (Onkar Bhojane – Vanita Kharat)

Advt.

यावेळी मात्र वनिताचा सहकलाकार ओंकार भोजने काही दिसला नाही. त्यामुळे अनेकांनी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील कलाकार आणि त्याच्यात काही वाद झाल्यामुळे वनिताने ओंकारला निमंत्रण दिले नसल्याचे अनेकांनी म्हटले होते. ओंकारने महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्यानंतर तो ‘फु बाई फु’ या कार्यक्रमात गेला. मात्र टीआरपी अभावी कार्यक्रम बंद झाला. तर असंख्य प्रेक्षकांनी त्याला परत येण्याची विनंती केली होती. ‘सरला एक कोटी’ या सिनेमात देखील ओंकार मुख्य भूमिकेत दिसला. या सिनेमात वनिता ही होती. आता वनिताने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

वनिताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की वनिता दार उघडते आणि समोर ओंकारला पाहून तिला धक्का
बसतो. तेवढ्यात ते एकमेकांना नेहमीप्रमाणे ‘वन्या’ आणि ‘भुज्या’ म्हणून हाक मारतात.
या दोघांची गळाभेट होत असतानाच ओंकारच्या मागून वनिताचा नवरा येतो आणि ओंकारला टपली मारत “हे सर्व स्कीटमध्ये आता ती माझी खऱ्या आयुष्यातील बायको आहे” असे म्हणताना दिसत आहे.
सध्या वनिताने शेअर केलेल्या या व्हिडिओत ओंकार लग्नाला येऊ न शकल्यामुळे तो वनिताच्या घरी येऊन तिला
सरप्राईज दिल्याचे तिने म्हटले आहे.
या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट देखील केले आहेत. तर ओंकारला पुन्हा एकदा हास्य जत्रेत सामील होण्याची
विनंती देखील अनेक चाहत्यांनी केली आहे.

Web Title :- Onkar Bhojane – Vanita Kharat | maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane came to meet vanita kharat after her marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shahnawaz Pradhan Passes Away | अभिनेते शाहनवाज प्रधान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime News | मालक – चालक यांच्या वादात हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना ठेवले कोंडून; लोणी स्टेशन येथील घटना

Akshay Kumar | अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याने केला हल्ला; व्हिडिओ व्हायरल