OTP चोरून तुमच्या बँक अकाऊंटमधून अशी होतीय फसवणूक, जाणून घ्या कसे सुरक्षित ठेऊ शकता पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले असताना ऑनलाईन व्यवहार करताना सर्व खबदारी घेने गरजेचे आहे. ऑनलाईन कोणताही व्यवहार करताना ओटीपी हे माध्यम सर्वात सुरक्षित असल्याचे समजले जात होते. परंतु तसे नाही कारण अशा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत ज्यामध्ये बदमाशांनी ओटीपी खाते धारकाकडूनच मिळवला आहे.

बँकेतील पैसे चोरण्यासाठी चोरटे काय करतील याची कल्पना नाही. आता चोरटे बँक खात्यातील रक्कम गायब करण्यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत. बँकेत जाऊन स्वतः खाते धारक असल्याचे सांगत खात्याचा मोबाईल नंबरच बदलण्याचेकाम चोरट्यांकडून सध्या केले जात आहे.

अशा प्रकारे सुद्धा होतीय फसवणूक
ओटीपी फ्रॉड संधर्भात बँकेतील मोबाइल नंबर बदलण्याच्या घटना वाढत असताना फसवणुकीचा दुसरा प्रकार देखील समोर आला आहे. खाते धारकाच्या मोबाइल नंबरचे ड्युब्लिकेत सिम कार्ड खोटी कागदपत्रे दाखवून घेतले जाते आणि हे सिम चालू होताच त्यावरील ओटीपीच्या सहाय्याने बँकेतील पैसे लंपास केले जातात.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी या गोष्टी नक्की करा
नवीन सुरक्षा यंत्रणांचा वापर करा
आपल्या पासवर्डला मजबूत करा आणि वारंवार बदलत रहा
फिशिंग आणि विशिंग पासून सावधान रहा
बँकेला आपली नवीन माहिती द्या
सुरक्षित नेटवर्क वरूनच बँक खाते ऑपरेट करा.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like