Online Banking | बँक खात्यातून कुणी पैसे गायब केल्यास काय करावे?, कशी परत मिळेल सर्व रक्कम; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – ऑनलाइन बँक (Online Banking) फसवणुकीचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ते रोखण्यात यंत्रणांना देखील अपयश येत आहे. यामुळे बँकांकडून ग्राहकांना सातत्याने अलर्ट केले जात आहे. या ऑनलाइन बँक (Online Banking) फसवणुकीत पैसे बुडाल्यास होणारे नुकसान कसे कमी करावे ते जाणून घेवूयात…
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
कसे मिळतील पूर्ण पैसे परत ?
बँकांकडून अशा सायबर फ्रॉड (Cyber fraud) च्या धोक्यापासून वाचण्यासाठी इन्श्युरन्स पॉलिसी (Insurance policy) घेतली जाते. अशावेळी बँक तुमच्यासोबत झालेल्या फ्रॉडची सर्व माहिती थेट इन्श्युरन्स कंपनीला सांगेल आणि तेथून इनश्युरन्सचे पैसे घेऊन तुमच्या नुकसानीची भरपाई करेल. अशा सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी इन्श्युरन्स कंपन्या लोकांना थेट कव्हरेज सुद्धा देत आहेत.
फ्रॉड झाल्यानंतर 3 दिवसांच्या आत करा तक्रार
जर तुम्ही बँकिंग फ्रॉडला बळी पडलेत तर तुम्हाला 3 दिवसांच्या आत याबाबत बँकेकडे तक्रार करावी लागेल. तरच तुमचे नुकसान होणार नाही. आरबीआयने म्हटले आहे की, निर्धारित वेळेत बँकेला माहिती दिल्यास ग्राहकांच्या खात्यातून फसवणुक करून काढलेली रक्कम 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यात परत येईल. जर बँक खात्यात झालेल्या फसवणुकीचा रिपोर्ट 4 ते 7 दिवसांनतर दिला गेला तर ग्राहकाला 25,000 रुपयांपर्यंत नुकसान सोसावे लागेल.
किती पैसे परत मिळतील
जर बँक अकाऊंट बेसिक सेव्हिंग बँकिंग डिपॉझिट अकाऊंट म्हणजे झीरो बॅलन्स अकाऊंट आहे तर तुमची लायबिलिटी 5000 रुपये असेल. म्हणजे जर तुमच्या बँक खात्यातून 10,000 रुपयांचे अनाधिकृत ट्राजंक्शन झाले असेल तर तुम्हाला बँकेतून 5000 रुपयेच परत मिळतील. उर्वरित 5000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल.
सेव्हिंग खात्यावर काय आहे नियम
जर तुमचे सेव्हिंग अकाऊंट आहे आणि तुमच्या अकाऊंटमधून अनाधिकृत ट्रांजक्शन झाले आहे तर तुमची लायबिलिटी 10000 रुपये असेल.
म्हणजे जर तुमच्या अकाऊंटमधून 20,000 रुपयांचे अनाधिकृत ट्रांजक्शन झाले असेल तर बँकेतून तुम्हाला 10,000 रुपयेच परत मिळतील.
उर्वरित 10,000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सोसावे लागेल.
क्रेडिट कार्डबाबत काय आहे नियम
जर तुमच्या करंट अकाऊंट किंवा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त लिमिटच्या क्रेडिट कार्डमधून अनाधिकृत ट्रांजक्शन झाले तर अशा प्रकरणात तुमची लायबिलिटी 25,000 रुपये असेल.
म्हणजे जर तुमच्या अकाऊंटमधून 50,000 रुपयांचे अनाधिकृत ट्रांजक्शन झाले आहे तर बँक तुम्हाला 25,000 रुपयेच देईल.
उर्वरित 25,000 रुपयांचे नुकसान सोसावे लागेल.
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Web Title : Online Banking | what to do if someone stole money from the bank account how to get the full amount back
हे देखील वाचा
Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ