ऑनलाइन ‘कॅसिनो’मध्ये सुरू होतं भलतच ‘काम’, छापा टाकल्यानंतर झाला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 10 हायप्रोफाईल बारबालांसह 70 जण गोत्यात

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पंजाबमधील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या ऑर्गनाईज्ड क्राईम कंट्रोल युनिटने रविवारी (दि. 31) पहाटे 3 सुमारास हायप्रोफाईल न्यू लाईफस्टाईल, मॅरेज पॅलेसवर छापा टाकला. यात जुगार (ऑनलाईन कॅसिनो) आणि सेक्स रॅकेटचा अड्डा उद्ध्वस्त केला. या प्रकरणी पोलिसांनी पॅलेसचा मालकासह 70 जण आणि 10 तरुणींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीत पटियाला आणि लुधियानाशी संबंधित काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या ऑर्गनाईज्ड क्राईम कंट्रोल युनिटच्या 30 लोकांच्या पथकाने ही कारवाई केली. या पॅलेसमधून 9 लाखांची रोकड, दारूच्या 40 बॉटल, जुगाराचे साहित्य आणि 10 मोबाईल फोनसह 47 वाहने जप्त केली आहेत. एसपी जसकीरत सिंह म्हणाले की, येथे महागडी दारू दिली जात होती. जुगार खेळला जात होता. या अड्ड्यातून मिळणारा पैसा गँगस्टरांना पुरविला जात होता. तसेच हे पंजाबमधील सर्वात मोठे सेक्स रॅकेट होते.

शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे आठवडयातून तीन दिवस हे रॅकेट आणि काळे धंदे सुरु राहत होते. हा पॅलेस एखाद्या क्लबसारखाच होता. आरोपींविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल केले असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. रॅकेट चालविणारा परमजीत सिंह पम्मीला देखील अटक केली आहे. पम्मी हा या भागातील मोठा असामी आहे. राजकारण्यांमध्ये वजन असल्याने तो हा धंदा करत होता.