‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विविध प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन दाखले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता विविध परीक्षांचे निकाल जाहीर होत आहे. नुकताच बारावीचा निकाल लागला असून काही दिवसांत दहावीचा निकाल लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखल विद्यार्थ्यांना सहज मिळावेत यासाठी पुणे शहर तहसील कार्यालयाने ऑनलाइन दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील प्रतिबंधक क्षेत्र वगळता उर्वरित भागातील महाईसेवा केंद्र व सेतू केंद्रातून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे शहर, पर्वती, एरंडवणा, शिवाजीनगर, औंध, बोपोडी, मुंढवा, घोरपडी, येरवडा, वानवडी या शहरातील सर्व पेठा हा पुणे शहर तहसील कार्यालय अंतर्गत येतो. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांनी http:// aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. तसेच अर्ज करताना किंवा संकेतस्थळाला काही अडचण असल्यास नागरी सुविधा केंद्राच्या [email protected] या ईमेलवर कागदपत्र पाठवावीत.

तसेच अधिक माहितीसाठी 9657759988 किंवा 7218851578 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

1. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे
स्वघोषणापत्र, फोटो, चालू वीजबिल किंवा चालू करपावती, रेशन कार्ड, आर्थिक वर्ष 2019-20 चे आयटीआर/फॉर्म 16/ तलाठी यांचा चौकशी अहवाल

2. वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे
स्वघोषणापत्र, फोटो, 10 वर्षाचा रहिवासी पुरावा, लाभार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, रेशनकार्ड/आधारकार्ड

3. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमापत्र
स्वघोषणापत्र, फोटो, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 1967 पासून महाराष्ट्रातील वास्तवाचे पुरावे, लाभार्थी आणि वडिल यांचा शाळा सोडल्याचा दाखला, रोशनकार्ड/आधार कार्ड/चालू वीजबिल/चालू करपावती

4. नॉन क्रिमीलेअर प्रमणपत्र
स्वघोषणापत्र, फोटो, लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तीन वर्षाचे उत्पन्नाचे दाखले, रेशनकार्ड/आधार कार्ड/चालू वीजबिल