Online Class | सावधान ! ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने या जगाला अशी स्थिती दाखवली आहे, ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. जगभरातील कोट्यवधी लोकांनी पहिल्यांदा लॉकडाऊनचा सामना केला, वर्क फ्रॉम होमसारखी व्यवस्था पाहिली आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन क्लासेससारखी (online class is very dangerous) व्यवस्था पाहिली. भारतात मागील दिडवर्षापासून ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. ऑनलाइन क्लासेसमुळे (online class is very dangerous) मुलांमध्ये मानसिक आणि शारीरीक आरोग्याच्या समस्या सुद्धा दिसून आल्या आहेत.

ऑनलाइन क्लासेस मुलांसाठी किती लाभदायक आहेत आणि किती नुकसानकारक आहेत? आणि जर नुकसानकारक आहे तर मुले कशाप्रकारे प्रभावित होत आहेत, हे डॉक्टरांकडून जाणून घेऊन एका वृत्ताने दिले. यामध्ये पारस हॉस्पिटलचे डॉ. (मेजर) मनीष मनन आणि डिव्हाईन माईंड क्लिनिकच्या डॉ. रूही सतीजा यांनी मुलांवर होणार्‍या ऑनलाइन क्लासेसच्या प्रभावाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

 

काय सांगितले तज्ज्ञांनी…

– मोबाइल फोनसमोर अनेक तास मुलांनी बसणे योग्य नाही.

अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनुसार 2 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांनी तर मोबाइल फोनच्या स्क्रीनपासून पूर्णपणे दूर रहावे.

2 ते 4 वर्षापर्यंतची मुले आपल्या आई-वडीलांसोबत जास्तीत जास्त एक तास मोबाईल स्क्रीन समोर बसू शकता.

यासंबंधीच्या स्टडीत सहभागी 58 टक्के मुलांना आरोग्यसंबंधी समस्या झाल्या.

18 टक्के पालकांना जाणवले की त्यांची मुले आता आक्रमक किंवा तापट झाली आहेत.

ऑनलाइन क्लासेसमुळे मुलांमध्ये अनेक शारीरीक समस्या जसे की शारीरीक तणाव, डोळ्यांचा तणाव, कंबरदुखी, डोकेदुखी, चिडचिडेपणा, लठ्ठपणा, तणाव, झोप न येणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

जर एखाद्या मुलाचा स्क्रीन टाइम आठवड्यात एक तास सुद्धा वाढवला तर लठ्ठपणाची शक्यता अनेक पट वाढते.

सर्व समस्या पाहता मुलांसाठी ऑनलाइन क्लासेस अजिबात योग्य नाही.

ऑनलाइन क्लासेसमुळे मुलांमध्ये तणाव आणि चिंता या समस्या वाढत आहेत.

Online Class मध्ये सोबतचे सहकारी विद्यार्थी नसल्याने अनेक समस्या होत आहेत.

ऑनलाइन क्लासेसुळे समाजापासून सुद्धा मुले वेगळी झाली आहेत, आणि इतक्या छोट्या वयात असे होणे कोणत्याही परिस्थिती योग्य नाही.

यामुळे त्यांच्या मानसिक विकासावर सुद्धा वाईट परिणाम होत आहे.

ऑनलाइन क्लासमुळे मुले डिमोटिव्हेट होत आहेत.

तसेच याच कारणामुळे मुले इनडिसीप्लीन सुद्धा होत चालली आहेत.

Web Title :- online class is very dangerous for children it is having a bad effect on the body as well as the mind

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा

Police Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण

PM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी