आता डॉक्टरांची ऑनलाइन तक्रार करता येणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वैद्यकीय क्षेत्र हे सर्वांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. डॉक्टर आपल्यासाठी देव असतो. त्यांच्या कृतीने एखाद्याचे प्राण वाचू शकतात तर एखाद्याचे प्राण जाऊ शकतात. मात्र अनेकदा डॉक्टरांकडून रुग्णांकडे दुर्लक्ष होते. तर बड्या रुग्णालयात पैशांची लुट होत असते. सामान्य लोकांना यासाठी कोणाकडे दाद मागावी हे समजत नाही. आणि कोणाकडे दाद मागितली तर त्यावर लवकर न्याय मिळत नाही. यावर काम करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे, अशी माहिती राज्य वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या निष्काळजीपणाविरोधात आता ऑनलाइन दाद मागणे, शक्य होणार आहे. डॉक्टरांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने ही ऑनलाइन सुविधा परिषदेच्या संकेतस्थळावर सुरू केली आहे. रूग्णालयांमध्ये डॉक्टरांकडून होणारे दुर्लक्ष किंवा आर्थिक लुबडणूक याविरोधात यावर तक्रारी करता येणार आहेत. यापूर्वीपासूनच अनेक तक्रारी राज्य वैद्यकीय परिषदेकडे प्रलंबित आहेत. मात्र लवकर यावर न्याय होत नाही. त्यामुळे रुग्णही तक्रारींचा पाठपुरावा करत नाहीत. ही रखडलेली कामे लवकर पुर्ण व्हावेत म्हणून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

रूग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी परिषदेने ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा बुधवारपासून सुरू केली आहे. परिषदेच्या संकेतस्थळावरच ही सुविधा उपलब्ध असून यासाठी रूग्ण किंवा डॉक्टरांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन सुविधेमुळे तक्रारीचा पाठपुरावा करणे रूग्ण आणि डॉक्टरांनाही सहज शक्य होईल. तक्रारीवर खुलासा करणारे कागदपत्र ऑनलाइन सादर करण्याची मुभा डॉक्टरांना असेल. या नवीन निर्णयामुळे रुग्णांच्या तक्रारींचे वेळेत निवारण होईल. यासंबधी नवीन पद्धत विकसित होणार आहे. ऑनलाईन तक्रार ही ठरावीक जागेवरून नाही तर राज्यातून कुठूनही करता येणार आहे, अशी माहिती वैद्यकिय परिषदेने दिली आहे.

दरम्यान, या ऑनलाईन तक्रार केंद्रावर नवीन तक्रारींसह जुन्या तक्रारीही दाखल करता येणार आहेत. जुन्या तक्रारींवरही लवकर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम