कामाची गोष्ट ! PF Nomination : आता वारस नोंदणी करा घरबसल्या तेही Online ‘ई-नॉमिनेशन’च्या माध्यमातून; जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतील सदस्यांना वारस नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वारसदाराची नोंदणी केल्यास सदस्याच्या मृत्यू झाल्यास त्यासंबंधी सर्व लाभ त्याच्या कुटुंबियांना दिला जाऊ शकतो. त्यामुळे हे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार, आता घरबसल्या भविष्य निर्वाह निधी वारस नोंदणी करता येणार आहे.

ऑनलाईन नॉमिनेशन करत असताना तुमचा आधारक्रमांक आणि मोबाईल क्रमांक EPFO कडे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. अनेकांना माहिती नसेल की ही नोंदणी ऑनलाईन करायची कशी ? तर आज आपण त्यासंबंधी माहिती घेणार आहोत…

– EPFO वेबसाईटर UAN आणि पासवर्ड टाकून Log In करा

– View वर क्लिक करून Profile वर क्लिक करून 100 KB पेक्षा कमी साईजचा फोटो अपलोड करा.

– Manage वर क्लिक करून E-Nomination वर क्लिक करा

– UAN, जन्मतारीख, लिंग, वडील/पतीचे नाव यांसारखी माहिती दिसेल.

– Profile वर जाऊन Yes क्लिक करून फॅमिली डिटेल्स अपडेट करता येऊ शकेल. तसेच तुम्हाला एकापेक्षा जास्त नॉमिनी नोंदवण्यात येऊ शकते.

– Add Family Details वर क्लिक करून नॉमिनेट व्यक्तीचे नाव द्यावे लागणार आहे. त्यासोबतच आधारक्रमांक आणि जन्मतारखेसंबंधित इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

– आपण नॉमिनीला टक्केवारीनुसार भागही देऊ शकता.

– Save EPF Nomination वर क्लिक करावे. त्यानंतर Sign वर क्लिक करून आधारक्रमांक किंवा VID वर क्लिक करून OTP Generate करावा.

– ही ऑनलाईन सुविधा फायद्याची ठरते. त्यानंतर नाव नोंदणी करता येऊ शकते.