Driving License बाबत दिलासादायक बातमी ! घरबसल्या होतील DL, RC शी संबंधीत कामे, वाचा नवीन गाईडलाईन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन तसेच कर्फ्यु लावण्यात आला आहे. यामुळे लोकांची अनेक कामे खोळंबली आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) संबंधीत कामे करणे अवघड झाले आहे. परंतु आता रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे आणि त्याच्या रिन्यूअलसाठी नवीन गाईडलाईन्स आणल्या आहेत. यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडण्याची आवश्यकता नाही.

ड्रायव्हिंग लायसन्सची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन

नवीन नियमानुसार, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल. म्हणजे अ‍ॅप्लीकेशनपासून लायसन्सच्या प्रिंटींगपर्यंत पूर्ण प्रोसेस ऑनलाइन होईल. सोबतच इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि डॉक्यूमेंट्सचा वापर मेडिकल सर्टिफिकेट्स, लर्नर लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर आणि त्याच्या रिन्यूअलसाठी केला जाऊ शकतो.

आरसी रिन्यूअलसाठी सवलत

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) चे रिन्यूअल आता 60 दिवस अ‍ॅडव्हान्समध्ये करता येऊ शकते. तसेच टेम्पररी रजिस्ट्रेशनची कालमर्यादा सुद्धा आता 1 महिन्याने वाढवून 6 महिने केली आहे.

ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओत जाण्याची आवश्यकता नाही

सोबतच सरकारने लर्नर्स लायसन्ससाठी सुद्धा प्रक्रियेत काही बदल केले आहेत. ज्यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओत जाण्याची आवश्यकता नाही, हे काम ट्यूटोरियलद्वारे घरबसल्या ऑनलाईन करता येऊ शकते. हे पाऊल कोरोना महामारीत मोठा दिलासा देणार आहे.

डीएल, आरसीची वैधता वाढवली

मार्चच्या अखेरीस रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने वाढते कोरोना संकट पाहता मोटर व्हेईकल डॉक्यूमेंट्स जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल), रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), फिटनेस सर्टिफिकेट, परमिट इत्यादीची वैधता वाढवून 30 जून 2021 केली आहे. मंत्रालयाने एक सर्क्युलर जारी करून म्हटले आहे की, संपूर्ण देशात कोरोनामुळे स्थिती खराब झाली असल्याने हे कागदपत्र जे 1 फेब्रुवारी 2020 ला एक्सपायर झाले होते, त्यांना पुढील 30 जून 2021 पर्यंत वैध मानले जाईल.