सरकारचा इशारा ! ‘या’ क्रमांकावरून येणारे फोन कॉल उचलू नका, अन्यथा रिकामं होवू शकतं बँक अकाऊंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाईन आणि मोबाइलचे वाढते फ्रॉड पाहता भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्सच्या सायबर सिक्युरिटीचे ट्विटर हँडल सायबर दोस्तवरून यूजर्सना इशारा देण्यात आहे. सरकारने यूजर्सना फेक कॉल्सबाबत अलर्ट केले आहे, या कॉल्सच्या मदतीने त्यांची फसवणूक होऊ शकते. यूजर्स सेफ रहावेत यासाठी हा इशारा देण्यात आला आहे.

बहुतांश  कॉल्स +92 आणि +01 ने सुरू होणार्‍या नंबर्सवरून
फ्रॉडच्या हेतूने केलेले बहुतांश कॉल +92 ने सुरू होणार्‍या नंबर्सवरून येतात. अशा नंबर्सवरून नॉर्मल व्हाईस कॉल्सशिवाय यूजर्सना व्हॉट्सअप कॉल्ससुद्धा करण्यात येत आहेत. अशा कॉल्सचा हेतू यूजर्सची पर्सनल आणि सेंन्सिटिव्ह माहिती चोरणे हाच असतो. कॉल करणारा बोलण्यात गुंतवून अशा डिटेल्स चोरतात. याशिवाय +01 ने सुरू होणार्‍या नंबर्सवरून सुद्धा यूजर्सला कॉल्स येत आहेत. अशा कॉल्सपासून सावध राहावे आणि आपल्या बँक डिटेल्स कधीही कॉलवर कुणासोबतही शेयर करू नका.

लकी ड्रॉ किंवा लॉटरीचे अमीष
कॉल दरम्यान लोकांच्या बँक अकाऊंट नंबरपासून डेबिट कार्ड डिटेल्सपर्यंतची माहिती चोरली जाते. यासाठी लोकांना लॉटरी जिंकणे किंवा लकी ड्रॉमध्ये नाव आल्याचे आमीष दाखवले जाते आणि बदल्यात बँकिंग डिटेल्स हे सांगून मागितल्या जातात की, जिंकलेली रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये पाठवली जाईल. फ्रॉड करणारा कोणत्याही मोठ्या कंपनीचे नाव घेऊन आपली सर्व्हिस खरी असल्याचे सांगतो आणि समोरच्या व्यक्तीला फसवतो.

असे कोड्स चुकूनही करू नका स्कॅन
कॉलरकडून अनेकदा क्यूआर कोड किंवा बारकोड पाठवून त्यांना स्कॅन करण्यास सांगितले जाते. चुकूनही असे कोड स्कॅन करू नका. स्कॅम करणारे एकापेक्षा जास्त कॉल सुद्धा वेगवेगळ्या नंबरवरून करू शकतात.