Online Fraud | व्हॅक्सिन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय तर सावधान, अन्यथा…(व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Online Fraud | कोरोनाच्या काळामध्ये अनेक व्यवहार, खासगी-सरकारी कामकाज (Private-government affairs) वर्क फ्रॉम होम सिस्टीमच्या माध्यमातून झाले. म्हणजेच ऑनलाईन कामास प्राधान्य देण्यात आले. यामुळे ऑनलाईन काम अधिक वाढले गेले. काम जरी वाढले असले तरी या काळामध्ये ऑनलाइन फसवणूक (Online fraud) देखील जास्त वाढल्याचे समोर आले आहे. अशा अनेक फसवणुकीच्या (Online fraud) तक्रारी अधिक दाखल झाल्या आहेत. यामुळे बँकेतून पैशाची अफरातफर होऊ नये. म्हणून भारतातील एक मोठी असणारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देखील सायबर क्राइमपासून (Cyber Crime) वाचण्यासाठी ग्राहकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत माहिती बँकेने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

मागील काही दिवसापासून कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला अटकाव घालण्यासाठी लसीकरणाला सुरुवात केली गेली. तर यादरम्यान लस घेतल्यानंतर काहीजण फोटो काढतात. आणि समाज माध्यमावर शेअर करतात. मात्र, असं करणं व्यक्तीच्या अंगलट येऊ शकते. याच कारणाने SBI सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट (Vaccination certificate) सोशल मीडियावर शेअर करत असल्याने त्यावरील तुमची वैयक्तिक माहिती असते. यामुळे तुम्ही ऑनलाईन फसवणुकीच्या (Online fraud) जाळयात अडकू शकता. या पार्श्वभूमीवर बँकेनं अलर्ट राहण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

सायबर क्राइमपासून वाचण्यासाठी टिप्स –

> Sharing is not caring अशा टायटलखाली SBI ने काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

> Social media प्लॅटफॉर्मवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका

> Vaccination certificate अथवा इतर कागदपत्र, ज्यामध्ये वैयक्तिक माहिती असेल ते कुठेही शेअर करू नका

> सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय कुणालाही पैसे हस्तांतरण (Transfer) करू नका

> असत्यापित (Unverified) लिंक्सवर अथवा संशयास्पद मेलवर क्लिक करू नका

> कुणाबरोबरही Debit card डिटेल्स / INB क्रेडेन्शिअल्स इ. शेअर करू नका

> चुकीची माहिती आणि खोट्या मेसेजेसपासून सावध राहा.

बँकेचं ट्विट –

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) असं सांगितलं आहे की, ‘नेहमी लक्षात ठेवा की तुमची वैयक्तिक माहिती खाजगी ठेवणं आवश्यक आहे. सायबर क्राइमच्या (Cyber Crime) घटना टाळण्यासाठी या काही टीप्सकडे लक्ष द्या’. अशाप्रकारे कोणती घटना घडल्यास रिपोर्ट करण्यासाठी बँकेने cybercrime.gov.in या लिंकवर क्लिक करण्याचा सल्ला दिला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Online Fraud | sbi cyber crime alert do not share your vaccination certificate and other personal information on social media

 

हे देखील वाचा

State Bank of India | कामाची गोष्ट ! बँकेत ‘फाटलेल्या’ अन् ‘कुजलेल्या’ नोटा बदलून मिळतात, पण प्रत्येक नोटसाठी द्यावं लागतं ‘एवढं’ शुल्क, जाणून घ्या

Gold Rate Today | 10,000 रुपये स्वस्त मिळतंय सोनं ! जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरातील दर

Congress | काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला सवाल, म्हणाले – ‘आमची स्वबळावर लढण्याची इच्छा पण तुम्हाला का मिरच्या झोंबतात?’