Online Free Ration Card | सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन कार्डसाठी एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत; घरबसल्या मोफत मिळवा रेशन कार्ड, जणून घ्या प्रोसेस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Online Free Ration Card देशात गरिबांना मोफत धान्य पोहचवण्यासाठी रेशन कार्डाचा (Online Free Ration Card) उपयोग केला जातो. केवळ धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र (Important Documents) आहे. रेशन कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. तसेच एजंटकडून जादा पैसे घेऊन नागरिकांची लूट केली जाते. त्यामुळे सरकारी कार्यालयातील एजंटकडून (Agent) नागरिकांची पिळवणूक थांबवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध करुन देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra State Government) घेतला आहे. तसे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून रेशन कार्ड मोफत दिले जाणार आहे.

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने (Department of Food, Civil Supplies & Consumer Affairs) याबाबत नुकताच निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी (Online Free Ration Card) तहसील कार्य़ालय, परिमंडळ कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करुन नागरिकांची पिळवणूक केली जाते. अनेकांनी तर तहसील आणि परिमंडळ कार्यालयात रेशन कार्ड काढून देण्यासाठी दुकाने थाटली होती. रेशन कार्डसाठी एजंटना पैसे दिल्याशिवाय काम होत नव्हते. त्यामुळे रेशन कार्ड कार्यालयात एजंटचा सुळसुळाट झाला होता. 20 रुपयांत मिळणारे रेशन कार्डसाठी दोन हजार रुपये इतकी रक्कम मोजावी लागत होती. त्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत होती.

सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारने मोफत ऑनलाइन रेशन कार्डची सुविधा उपलब्ध केली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न योजनेच्या (National Food Scheme) अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Food Scheme), प्राधान्य कुटुंब योजना (Priority Family Scheme) तसेच राज्य योजनेच्या (Maharashtra State Scheme) सर्व रेशन कार्ड धारकांना ऑनलाईन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका मोफत दिली जाणार आहे. अर्जदाराने शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यावर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करुन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करुन देली जाईल. यासाठी http://rcmc.mahafood.gov.in या वेबसाईटवरुन ही ई-शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल.

किती दिवसात मिळणार रेशन कार्ड?

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जदाराची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी (District Supply Officer)
अथवा अन्न धान्य वितरण अधिकारी (Food Grain Distribution Officer) संकलित करतील.
त्यानंतर अर्जदार नेमका कोणत्या प्रकारातील आहे यावरुन त्याचे रेशन कार्ड किती दिवसात मिळेल हे ठरणार आहे.
अर्जदार जर अंत्योदय किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असेल तर पूर्वीप्रमाणे रेशन अधिकाऱ्यांना
आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच वीस
दिवसांची मुदत असणार आहे. पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वीप्रमाणे सात दिवस लागणार आहेत.
रेशन कार्डची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ते ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे.
एवढेच नाहीतर अर्जदाराला कोणते रेशन दुकान मिळाले याचा उल्लेख त्यामध्ये असणार आहे.

ऑनलाईन रेशन कार्ड मिळण्याच्या पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे.
यासंदर्भातील माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्याने पुढील सोपस्कर कमी होणार असल्याचे,
जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने (Surekha Mane) यांनी सांगितले.

Web Title : Online Free Ration Card | Online free ration card will be available online in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘राष्ट्रवादीचे आमदार भाजपात येण्यास तयार, पण…’, भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

Pune Crime News | विश्रामबाग पोलिस स्टेशन : पतीनेच सासू आणि त्यांच्या मित्राचे फोटो मार्फ करुन बनवले नग्न फोटो, नातेवाईकांना पाठवून केला विनयभंग

Pune LokSabha Bypoll Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक ‘या’ तारखेच्या आत होणे अपेक्षित, जाणून घ्या सविस्तर